आतापर्यंत २८५ कोटींची मदत जमा…
मुंबई – बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी कोविड विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी मनापासून धन्यवाद दिले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय कांबळे, जनरल मॅनेजर, मुंबई यांनी काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली. या रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच मुख्यमंत्री कार्यालयात जमा केला.
कोविड १९ या विषाणूविरुद्धच्या लढ्यात आबालवृद्ध सहभागी होत आहेत. आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनीही यात सहभागी होत आपले योगदान दिले असून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी दिला आहे.
आतापर्यंत २८५ कोटींची मदत जमा…
या मदतीसह आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण २८५ कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रला आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.