मुंबई : मध्य प्रदेश सरकारचा मानाचा 2018चा किशोर कुमार पुरस्कार देऊन ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना सन्मानित करण्यात आले. मध्य प्रदेशचे सांस्कृतीक मंत्री डॉ. विजयालक्ष्मी साधो यांनी रहमान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला.
दोन लाख रूपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खांडवा येथे किशोरकुमार यांच्या जयंतीला झालेल्या कार्यक्रमाला या 82 वर्षीय अभिनेत्री उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.
रेहमान यांचा तीन फेब्रुवारीला वाढदिवस असतो, त्याबद्दलही साधो यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मध्यप्रदेशचे सांस्कृतिक खात्याचे मुख्य सचिव पंकज रागही यावेळी उपस्थित होते, असे सरकारच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.