वाघोली : वाघोली- केसनंद-वाडेबोल्हाई
– राहु रस्त्याच्या कामासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या विशेष प्रयत्नातून ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच वाडेगाव शिव ते साष्टे रस्त्यासाठी १० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही कामांचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती सरपंच दिपक गावडे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, युवक प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रदीपभाऊ कंद, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष योगेश शितोळे, वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे, उपसरपंच सविता गावडे, उपसरपंच सुरज भोरडे, शिवाजी भोरडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस भाऊ वारघडे, माहिती सेवा समिती चे चंद्रकांत वारघडे आदी मान्यवर उपस्थित होते .