जयपूर – शौचाला गेलेल्या तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना तरूणींनी चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील हमीरपुर येथे तरूणी आपल्या शेतात शौचासाठी गेल्या असता काही तरूण त्यांची छेड काढत असत.
वारंवार होणाऱ्या या घटनेला कंटाळून तरूणींनी चोप देत तरूणांना चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर पळ काढून त्यांनी स्वत:चा बचाव केला. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हरसोरा पोलीसांनी सांगितले की, चार पाच तरूण शेताच्या बांधावर येऊन बसत असत. शौच्यासाठी गेलेल्या तरुणींची छेड काढत असत. दररोजच्या त्रासाला कंटाळून तरूणींनी छेड काढणाऱ्यांना चोप देत चांगलाच धडा शिकवला.
शनिवारी सायंकाळी पिडित तरूणी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी छेड काढणाऱ्यांविरूद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल.