मध्य प्रदेशातील सिधी येथील भाजप खासदार रिती पाठक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये खासदार एका कौटुंबिक कार्यक्रमात ‘घुंघरू टूट जाएगा’ या हरियाणवी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आपल्या पुतण्याच्या हळदी समारंभात त्यांनी हे ठुमके लावल्याचे सांगितले जात आहे.
महिला खासदाराचे 'घुंघरू टूट जाएगा' वर ठुमके; खासदार रिती पाठक यांचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/s9gznFN3ry
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 25, 2022
रिती पाठक या सिधी-सिंगरौलीच्या खासदार आहेत. सिंगरौली येथे त्यांच्या पुतण्याचे लग्न होते. दरम्यान, हळदी समारंभात अन्य दोन महिलांसह खासदार रिती पाठक यांनी डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ बनवताना रिती पाठकही काही क्षण थांबल्या.मात्र, नंतर महिलांनी त्यांना स्टेजवर नाचत राहण्याचे आवाहन केले. यानंतर खासदार रिती यांना स्टेजवर पुन्हा ठुमके लावले.