मुंबई – बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्सस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सूरुवात झाली असून, या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
आमिर खान गाझियाबादेत शूटींग करतोय, म्हटल्यावर चाहते उत्सुक झालेत आणि शूटींग स्थळी मोठी गर्दी जमली. आमिरची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येत शूटींगस्थळी धाव घेतली. आमिरही आपल्या चाहत्यांना नाराज न करता त्यांना भेटला. पण यादरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली. चाहत्यांना भेटताना त्याने ना तोंडावर मास्क लावला ना फेसशिल्फ लावले.
भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी आमिरच्या या वागण्यावर तीव्र आक्षेप घेत थेट त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. ‘लाल सिंह चड्ढा’ शूटींगदरम्यान एका वादाला तोंड फुटले आहे. केवळ वाद नाही तर याप्रकरणी आमिरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोव्हिड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.