Vijay Hajare Trophy – भारतीय क्रिकेटमध्ये अनेक युवा खेळाडू आपल्या कौशल्याने छाप सोडत आहेत. आयपीएलसोबत राष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी असते. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू मोठं मोठ्या विक्रमांना गवसणी घालतात. त्याचप्रमाणे यंदाच्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही अनेक नवीन विक्रम खेळाडूंनी रचले आहेत. विजय हजारे करंडकाच्या सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश आमने-सामने होते. या सामन्यात मोठा विजय मिळवत तामिळनाडूने नवा विक्रम रचला आहे. या सामन्यात तामिळनाडू संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २ गडी गमावून ५०६ धावा केल्या.
रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वी सूर्यकुमारबद्दल एक भविष्यवाणी केली, तोच आता बनलाय चर्चेचा विषय
नारायण जगदीशनच्या गळ्यात विक्रमांची माळ
अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात तामिळनाडू संघाच्या एकूण धावसंख्येव्यतिरिक्त इतरही अनेक विक्रम निर्माण झाले. या सामन्यात तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनने १४१ चेंडूत २७७ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने आपल्या खेळीत २५ चौकार आणि १५ षटकार फाटकावले. लिस्ट ए क्रिकेटमधील एखाद्या खेळाडूची ही आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. या खेळीसह त्याने फलंदाज अॅलिस्टर ब्राऊनचा २००२ मधील २६८ धावांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर लिस्ट ए क्रिकेटच्या एका हंगामात सलग ५ शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराच्या ४ शतकांना मागे टाकले आहे.
रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वी सूर्यकुमारबद्दल एक भविष्यवाणी केली, तोच आता बनलाय चर्चेचा विषय
विजय हजारे करंडकाच्या एका हंगामात सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत जगदीशनने विराट कोहली, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांना मागे टाकले आहे. विजय हजारे करंडकाच्या १२ नोव्हेंबर रोजी बिहार विरुद्धच्या सामन्यात जगदीशन ५ धावा करून बाद झाला होता. मात्र, यानंतर आंध्रविरुद्ध नाबाद ११४ धावांची खेळी, छत्तीसगडविरुद्ध १०७, गोव्याविरुद्ध १६८ आणि हरियाणाविरुद्ध १२८ धावा केल्या. यानंतर आता अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात २७७ धावांची जबरदस्त खेळी करून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Jaggi’s (Pancha)TONdhiram! 💯 🖐️#VijayHazareTrophy #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/K5W9z6PWPd
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 21, 2022
सीएसके संघाने रिटेन केले नाही
आयपीएलच्या २०२३ हंगामासाठी सर्व संघांनी त्यांचे रिटेन आणि रिलीज केलेले खेळाडू जाहीर केले आहेत. यादरम्यान चेन्नई संघाने आपल्या संघातील काही खेळाडूंना रिलीज केले. यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज नारायण जगदीशनलाही रिलीज केले आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी जगदीशनच्या या कामगिरीने लिलावात तुफान येणार हे नक्की आहे. त्याचबरोबर विजय हजारे करंडकमध्ये त्याची हि कामगिरी पाहता त्याला रिलीज करून चेन्नई संघाने चूक केल्याचे दिसत आहे.