नवी दिल्ली – तिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभाग 64 मध्ये नगरसेवकपदाची निवडणूक जिंकल्यानंतर AIMIM उमेदवाराच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची झोप उडाली आहे. उपनिरीक्षकाच्यावतीने चार नामांकित व दोनशे अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
व्हिडिओच्या आधारे पोलिस आरोपीची ओळख पटवत आहेत. युपीमधील गाजियाबाद येथील महापालिका निवडणुकीची मतमोजणी शनिवारी झाली. प्रभाग 64 मधून एआयएमआयएमच्या नगरसेविका तबस्सुमन जहाँ या विजयी झाल्यानंतर समर्थकांनी मिरवणूक काढली. यावेळी प्रशासनाच्या बंदीनंतरही नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. विजयी उमेदवाराच्या पतीने यावेळी जोरदार जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.
या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडिया आणि ट्विटरवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने युवक दुचाकीवरून आवाज करत हातात झेंडे घेऊन चालत असल्याचे दिसून येत आहे. तसेच उत्साहाच्या भरात एका कार्यकर्त्याने मिरवणुकीत पैसे देखील उडवल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. पत्नी नगरसेवक झाल्याच्या आनंदात कार्यकत्यांनी थेट पतीलाच घोड्यावर बसवून मिरवणूक काढल्याचे समोर आले.
गाजियाबाद में विजयी जुलूस में समर्थकों ने उड़ाए नोट, घोड़े पर बैठा सभासद पति। #UPnikayelection pic.twitter.com/k2ECJWuLgq
— Nitin Yadav (@nitinyadav9258) May 15, 2023
ट्विटरवरून काही व्यक्तींनी या व्हिडीओसह पोलीस प्रशासनाला टॅग केले त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाल्याचे पाहायला मिळाले. व्हिडिओच्या आधारे परवेझ चौधरी, आर्यन चौधरी, शाहरुख आणि शाहरुख सैफी आणि दोनशे अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त साहिबााबाद भास्कर वर्मा यांनी सांगितले की, व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत असून तपासानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.