नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील संतापजनक घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केली असल्याची संतापजनक कृती केल्याचे दिसत आहे. आरोपीने पीडित तरुणाच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर लघुशंका केली आहे. पीडित व्यक्ती आदिवासी समाजातील असून ती मजुरीचं काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवेश शुक्ला असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात सिधी येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
ये अमानवीय वीडियो मप्र BJP MLA केदार शुक्ला के विधायक प्रतिनिधि प्रवेश शुक्ला का है,
इस वीडियो को देखने के बाद शब्दों में आक्रोश को बयां कर पाना संभव नही।
मुख्यमंत्री @ChouhanShivraj जी, थोडी भी शर्म और इंसानियत बाकी है तो गरीबों पर चलने वाले बुलडोजर को इस भाजपाई पर चलवाईये। pic.twitter.com/UK6JQ7nUfo
— Srinivas BV (@srinivasiyc) July 4, 2023
दरम्यान, या संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर याची दखल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना आरोपीला लवकरात लवकर अटक करावी. तसेच आरोपीविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदानुसार कठोर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
मेरे संज्ञान में सीधी जिले का एक वायरल वीडियो आया है…
मैंने प्रशासन को निर्देश दिए हैं कि अपराधी को गिरफ्तार कर कड़ी से कड़ी कार्रवाई कर एनएसए भी लगाया जाए।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 4, 2023
यासंबंधी शिवराज सिंह चौहान यांनी एक ट्वीट करत त्यामध्ये ,”सिधी जिल्ह्याचा एक व्हायरल व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला आहे. दोषीला अटक करून कठोर कारवाई करण्याचे आणि एनएसए लागू करण्याचे आदेश मी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मध्य प्रदेशातील विरोधी पक्षनेत्यांनीही या व्हिडीओवरून तीव्र टीका केली. माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, “एवढ्या घृणास्पद आणि विकृत कृतीला सुसंस्कृत समाजात थारा नाही. मध्य प्रदेशातील आदिवासींवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत.”