नवी दिल्ली – शेतकरी कोणताही असो नैसर्गिक आपत्ती आणि स्थानिक जनावरे यापासून होणारे नुकसान टाळणायसाठी त्याला नेहमीच कसरत करावी लगते. असाच एक प्रकार सध्या तामिळनाडूमधून (Tamilnadu news) समोर आला आहे. याठिकाणी शेतात घुसलेल्या हत्तीनी अक्षरशः स्थानिकांना सळो की पळो करून सोडलं आहे.(five elephants in farm)
तामिळनाडूतील धर्मापुरी येथील शेतात पाच जंगली हत्तींनी कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यानंतर वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (elephants video viral)
या प्रकारचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. एका वृत्तसंस्थेने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हत्तींनी केलेल्या राड्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती शेतात धावताना दिसत असून शेतकरी त्यांना शेतातून हाकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
#WATCH | Tamil Nadu | Five wild elephants entered the agricultural land and damaged the crops in Dharmapuri, farmers requested the Forest Department to provide compensation for the damage to their crops caused by the wild elephants. pic.twitter.com/qoeGM5VojQ
— ANI (@ANI) November 24, 2023
डीएफओ अप्पाला नायडू यांनी सांगितले की, होगेनक्कल भागात याचिका दाखल करण्यासाठी आणि नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही त्वरित कारवाई करू. जर काही विलंब झाला असेल तर कृपया माझ्याकडे याचिका सादर करा आणि मी तात्काळ मदत करीन असं आवाहन त्यांनी स्थानिकांना केलं.