पंढरपूर – फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळून पंढरपूरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीघे जण जखमी झाले आहेत. अरूंद पुलावरून जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रविवारी रात्री हा अपघात झाला.
अपघातात मीना देशमुख यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केले. मात्र कार 50 फुट खोल दरीत कोसळली होती. दरीत उतरण्यासाठी त्याठिकाणी काही सोय नसल्याने बराच काळ बचावकार्यास लागला.
गावकऱ्यांनी सर्वांना बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केले. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं कार या खोल कालव्यात पडल्याचं सांगितलं जात आहे.