मुंबई, दि. 26 – ज्येष्ठ पत्रकार अनिल धारकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते सत्तरीच्या वयातील होते. मुंबई आंतरराष्ट्रीय लिटरेचर फेस्टीव्हल, लिटरेचर लाइव्ह अशा अनेक उपक्रमांसाठी त्यांनी पुढकार घेतला होता.
साहित्य व पत्रकारीतेच्या क्षेत्रात ते जवळपास पाच दशके कार्यरत होते. मिड डे सह अनेक नियतकालिकांचे ते संपादक होते. त्यांनी अनेक दैनिकांसाठी कॉलम रायटिंगही केले आहे. देशी आणि विदेशी वृत्तपत्रांमध्ये त्यांचे नियमीत स्तंभ लेखन सुरू असायचे.
ज्येष्ट स्तंभ लेखक बाची करकारीया यांनी त्यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, त्यांच्या निधनाने आपण एक अत्यंक कल्पक माणूस गमावला आहे. दक्षिण मुंबईत आकाशवाणी ऑडिटोरियमच्या स्थापनेतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.