-->

उत्तराखंड दुर्घटनेतील मृतांची संख्या 58 वर

तपोवरन / डेहराडून – उत्तराखंड मधील तपोवन येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 58 झाली आहे. तपोवन बोगद्यात आज आणखी दोन मृतदेह आढळून आले आहेत. गेले दहा दिवस त्या बोगद्यात अडकलेल्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.

अजूनही त्या दुर्घटनेतील 148 लोकांचा शोध लागणे बाकी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने तपोवन ते विष्णुगढ प्रकल्पासाठी हा बोगदा खणला आहे. त्यात तीस जण अडकले होते अशी सुरूवातीची शक्‍यता वर्तवण्यात आली होती. पण त्यात अडकलेल्यांची संख्या त्याही पेक्षा जास्त आहे.

उत्तराखंड मध्ये मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या सर्व तुकड्यांनी आता आपले सारे लक्ष या ठिकाणीच केंद्रीत केले आहे. या बोगद्यात अडकलेल्यांपैकी आणखी किती जण जिवंत असण्याची शक्‍यता आहे असे विचारता एनडीआरएफच्या कमांडरने सांगितले की या विषयी अजून काहीही सांगता येत नाही पण काही वेळा चमत्कार घडू शकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.