मुंबई – अभिनेता अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या अमूल्य नात्यावर आधारित आहे. ट्रेलरनुसार, अक्षय आणि भूमीचा आगामी चित्रपट हुंडा प्रथेवर एक मोठा संदेश देणार आहे. ट्रेलर पाहून अनेक लोक भावूक होताना दिसले, तर काही अक्षयचा लूकवरून त्याला ट्रोल करतांना दिसत आहे.
It’s a story of love, joy, family and the unbreakable bond that binds them… come be a part of this grand celebration of life.
#RakshaBandhanTrailer out tomorrow.
#ReturnToFeelings#RakshaBandhan11August pic.twitter.com/mms7t0b0hv— Akshay Kumar (@akshaykumar) June 20, 2022
अक्षय कुमार का होतोय ट्रोल?
‘रक्षा बंधन’चा ट्रेलर खूपच भावूक असणार आहे यात शंका नाही. चित्रपटाची कथा नवीन असली तरी अक्षय कुमारचा लूक जुना आहे. त्यामुळे सोशल मीडियावर युजर्स या लूकवरून संमिश्र प्रतिक्रिया देत आहे. ट्रेलर समोर आल्यानंतर अनेकांनी अक्षयच्या मिशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रत्येक चित्रपटात अक्षयचा लूक सारखाच का असतो, असे युजर्सचे म्हणणे आहे.
‘रक्षा बंधन’चा ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांना अक्षय कुमारचे जॉली एलएलबी, गोल्ड, बच्चन पांडे आणि टॉयलेट: एक प्रेम कथा यांसारखे अनेक चित्रपट आठवले. या सर्व चित्रपटांमध्ये अक्षय कुमार मिशीत दिसला. त्याचवेळी, यावरून अनेक युजर्सनी खिलाडी कुमारला ट्रोल केले आणि म्हटले की, त्याने त्याच घरात पडलेल्या जुन्या मिशा लावल्या.
हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट राखीच्या मुहूर्तावर म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. अक्षय व्यतिरिक्त भूमी, शाहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा लाल सिंग चड्ढा अक्षयच्या सिनेमाला टक्कर देताना दिसणार आहे. आता बघूया आमिर आणि अक्षयच्या चित्रपटात कोणाला प्रेक्षकांचं जास्त प्रेम मिळतं.