नवी दिल्ली :- भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्या पराभवामुळे भारताचे अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सेनला उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या ली शी फेंगकडून 21-17, 22-24, 21-17 असा पराभव स्वीकारावा लागला. हा सामना तब्बल 1 तास 16 मिनिटे चालला.
फेंग जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर आहे. मात्र, सेननेन त्याला चांगलीच तुल्यबळ लढत दिली. मात्र, त्याला मोक्याच्या क्षणी आपल्या सर्व्हिस राखण्यात अपयश आले व सामना गमवावा लागला.
खरेतर लक्ष्यची फेंगविरुद्धची यापूर्वीची कामगिरी अभिमानास्पद होती. त्याने आजवर फेंगविरुद्ध झालेल्या सात सामन्यांत 5 वेळा विजय मिळवला होता. केवळ याच लढतीत त्याला सूर गवसला नाही व पराभवाचा सामना करावा लागला.