नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अश्या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नसल्याने अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता 27 जून रोजी होणारी upsc ची पूर्व परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यूपीएससीची पूर्व परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय UPSC ने घेतला आहे.