चिंबळी – मोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शितल निलेश गवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मोई ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने उपसंरपच सचिन येळवंडे यांनी उपसरपंचपदाचा ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त जागेसाठी मंगळवारी (दि. 14) सरपंच शिलाताई रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी शितल गवारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामसेवक भास्कर वीर यांनी घोषित केले.
यावेळी मावळते उपसरपंच सचिन येळवंडे, सदस्य विश्वनाथ गवारी, सदस्या मंगल गवारी, ज्योती करपे, शितल गवारे, अर्चना फलके, पोलीस पाटील नारायण बिडकर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शितल गवारे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, मावळते उपसंरपच, सर्व सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने माजी आदर्श सरपंच राहुल गवारे, माजी उपसरपंच किरण गवारे, देवीदास मेदनकर आदि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष समीर गवारे, उपाध्यक्ष नामदेव गवारे, गोरक गवारे, युवा उद्योजक निलेश किसन गवारे, मोहन गवारे, दत्ता साकोरे, नितीन गवारे, दत्ता हजारे, संतोष गवारे, आनंद गवारे यांच्यासह सर्व सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाळुंगे पोलीस चौकीच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
“गेल्या दोन वर्षांपासून कारोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुठल्याही प्रकारचे वाद्य न वाजता, गुलाल भंडाऱ्याची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी न करता उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली.”
– राहुल गवारे, (माजी आदर्श सरपंच, मोई)