पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकात होणारी आता नागरिकांना नित्याचीच ठरली आहे. वाहतूक विभागाने वाहतूक कोंडीवर पर्यायी रस्ते आणि एकेरी वाहतुकीचा मार्ग अवलंबला. मात्र अद्यापही ही कोंडी फुटली नसल्याचे चित्र असून, “पीक अवर्स’मध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या कडक ऊन आणि वाहनांच्या रांगा यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दुहेरी उड्डाणपूल प्रस्तावित आहे. याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. मात्र या कामामुळे नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. औंध, बाणेर आणि पाषाणच्या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या अधिक असते. प्रामुख्याने ई-स्क्वेअर थिएटर ते पुणे विद्यापीठ चौक मार्गावर सध्या काम सुरू आहे.त्यामुळे याठिकाणी वाहतुकीसाठी अरुंद रस्ता उपलब्ध होत असल्याने वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे याठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.