Uddhav Thackeray on Shrikant Shinde – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर बुधवारी निकाल दिला. यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. अशातच शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून घराणेशाहीच्या राजकारणावर भाष्य केलं होतं.
पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी आज समाचार घेतला. ‘पंतप्रधान कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर बोलले नाहीत’ असं म्हणत त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
कल्याण-डोंबिवली येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? । Uddhav Thackeray on Shrikant Shinde
“कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान मोदी बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का? गद्दार लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय… हा सगळा बोगसपणा आहे. घराणेशाहीवर एका घरंदाज माणसानं बोलेलं चांगलं” असा घणाघात ठाकरेंनी केला.
ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘ठाकरेंनी घराणेशाहीची व्याख्या सांगितली पाहिजे’ असं म्हंटलंय. ( Uddhav Thackeray on Shrikant Shinde )
विधानसभा अध्यक्षांचा निकाल अन् घराणेशाहीच्या वादाची ठिणगी
तत्पूर्वी, विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिल्यानंतर घराणेशाहीच्या वादाची ठिणगी पडली होती. निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राजकारणातील घराणेशाहीकडे बोट दाखवले होते. यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, श्रीकांत शिंदे यांच्याबाबत सवाल उपस्थित केला होता.
शिंदेंनंतर पंतप्रधानांचेही घराणेशाहीकडे बोट । PM Modi in Maharashtra
“घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं अरपिमित नुकसान झालं आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचा प्रभाव कमी करण्यासाठी देशातील युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं” असं आवाहन पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी केलं होत.
घराणेशाहीचा मुद्दा लोकसभा निवडणुकांमध्ये गाजणार? | Loksabha Election 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारच्या महाराष्ट्र दौऱ्यात घराणेशाहीच्या राजकारणाविरोधातील वक्तव्य, आगामी लोकसभा निवडणुक प्रचाराचा ‘घराणेशाही’ हा प्रमुख मुद्दा असणार असल्याचे सुचवते.
पंतप्रधानांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत शिंदेंविरोधात आघाडी उघडली आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना घराणेशाहीच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला तर विरोधकांकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असाच संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं शनिवारच्या राजकीय घडामोडींवरून दिसत.
इतर महत्वाच्या बातम्या
‘कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते’ ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर जहरी टीका
“कारसेवकांचे स्वप्न पूर्ण होतय, आनंद साजरा करा”; राज ठाकरेंचे आवाहन