Uddhav Thackeray । शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता या सुनावणीची नवीन तारीख समोर आली असून, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मशाल चिन्हाचा वापर करावा लागणार असल्याचं चित्र दिसत आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या निर्णयात सभापतींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता.
यासोबतच शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचाही निकाल दिला होता. विधानसभेतील बहुमताच्या जोरावर शिंदे गटालाच खरी शिवसेना मानण्याचा सभापतींचा निर्णय चुकीचा असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
सुनावणीची नवीन तारीख आली समोर – । Uddhav Thackeray
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. या निकालाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. आता हा कालावधी जवळपास नऊ-दहा महिने झाला असतानाही यावर सुनावणी झालीच नाही.
अश्यातच निकालाची नवीन तारीख समोर आली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ताबा कुणाचा या संदर्भातली सुनावणी १९ एप्रिलला होणार आहे. आधी ही सुनावणी १ मार्चला होणार होती. मात्र, आत थेट १९ एप्रिल तारीख देण्यात आली आहे.
तेव्हापर्यंत लोकसभेची आचारसंहिता घोषित झालेली असेल. कदाचित पहिला टप्पाही पार पडलेला असेल. त्यामुळे ठाकरे गटाला आता आहे त्याच मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्ष स्थापन – । Uddhav Thackeray
व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या प्रश्नासाठी 1966 मध्ये शिवसेना पक्ष स्थापन केला. आणि ते शिवसेना प्रमुख बनले. त्यांच्यासोबत लाखो कार्यकर्ते जोडले गेले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला.
शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात बळवंत मंत्री, माधव देशपांडे, श्याम देशमुख हे तर नंतर थोड्याच दिवसात मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी , छगन भुजबळ हे शिवसेनेचे नेते होते.
दिवसेंदिवस शिवसेना मोठा पक्ष बनत होता. तसा दबक्या आवाजात बाळासाहेबांच्या हुकूमशाही विरुद्ध आवाज निर्माण होऊ लागला. पण बाळासाहेबांचा शब्दच आदेश मानणारे लाखो कार्यकर्ते होते आणि आजही आहेत. । Uddhav Thackeray