श्रीनगर – शाळेत घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. या हल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू -काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील ईदगाह परिसरात हा दहशदवादी हल्ला झाला आहे. जम्मू -काश्मीरमध्ये मंगळवारी सुद्धा हल्ला झाला होता.
J&K LG Manoj Sinha condemns the killing of two teachers in a Srinagar school
"A befitting reply will be given to perpetrators of the heinous terror attacks on innocent people. Terrorists & their patrons will not succeed in disturbing peace, progress&prosperity of J&K," he says. pic.twitter.com/XnMvhw6C24
— ANI (@ANI) October 7, 2021
दहशदवाद्यांच्या या हल्यात मुख्याध्यापक आणि एका महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला श्रीनगरमधील सफा कदल भागात झाला आहे.
Jammu and Kashmir | Firing incident reported in Eidgah area of Srinagar; Details awaited
— ANI (@ANI) October 7, 2021
दहशतवादी असल्याचा संशय असलेल्या बंदूकधाऱ्यांनी येथील अलोचीबाग येथील रहिवासी सतींदर कौर आणि दीपक कौर या दोघांवर सफा कडल येथे गोळीबार केला आणि ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर दोघांनाही SKIMS रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी जीएनएसला सांगितले आहे.