सिलचर – केंद्रीय अन्वेषण ब्युरोने 2 कोटी रुपयांच्या कथित लाच प्रकरणात ईशान्य फ्रंटियर रेल्वे झोनच्या दोन अभियंत्यांसह तिघांना अटक केली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. सीबीआयने सिलचरमध्ये तैनात असलेले वरिष्ठ विभाग अभियंता संतोष कुमार आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपमुख्य अभियंता रामपाल यांना अटक केली आहे, तसेच त्रिबेणी कन्स्ट्रक्शनचे मालक कॉन्ट्रॅक्टर सज्जन चौधरी यांनाही अटक केली आहे.
अधिका-यांनी सांगितले की, कुमारला बांधकाम कंपनीकडून आठ लाख रुपयांचे पार्ट पेमेंट घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले की एजन्सीने 19 परिसरांवर छापे टाकले आणि 1.10 कोटी रुपये रोख जप्त केले, त्यापैकी 67 लाख रुपये अटक केलेल्या उपमुख्य अभियंता रामपालच्या सासऱ्यांकडून जप्त करण्यात आले. सीबीआयने नऊ जणांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात त्रिबेणी कन्स्ट्रक्शन्सने एका प्रकल्पासाठी कोटी रुपयांचे बिल सादर केल्याचा आरोप केला आहे.