थेऊर- येथे रोहित उदावंत यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणांमध्ये गुन्हे शोध पथकाच्या विभागाने दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणातील महिला आरोपी श्वेता ऊर्फ गौरी मुकेश गवळी हिस अगोदरच पोलिसांनी जेरबंद केले आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समीर चमनशेख, नितीन गायकवाड, परशुराम सांगळे, सागर कडू यांनी श्वेता ऊर्फ गौरी हिस गुरुवार (दि. 22) हडपसर येथे ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज रोहित चौधरी यांस सोरतापवाडी (ता. हवेली) येथे तर शुभम जगताप यांस कोरेगाव भीमा येथे सापळा रचून जेरबंद केले. मात्र, या प्रकरणातील आरोपी साई रेड्डी अजूनही फरार आहे. पोलीस पथक त्याचा कसून तपास करीत आहेत.