न्यूयॉर्क – ऍलन मस्क यांनी ट्वीटर खरेदी केल्यानंतर एकेकाला नोकरीवरून कमी केले जाते आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या या मुद्द्यावरून मस्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हे सुरू असतानाच आता ज्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे त्या लोकांनी सोशल मीडियावर मस्क यांच्या विरोधात मोहीम छेडली आहे.
दरम्यान, आम्ही केवळ मस्क यांच्या विरोधात बोलल्यामुळेच आम्हाला कामावरून काढून टाकण्यात आले असा दावा मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या 8 माजी कर्मचाऱ्यांनी केला आहे. जून महिन्यात मस्क यांच्या विरोधातील एका ठरावाचा मसूदा तयार करण्यात आला होता. ज्या समुहाने हा मसूदा तयार केला होता. त्याचा आम्ही एक भाग होतो. त्यामुळे आमच्यावर कारवाई करण्यात आली असा दावा या 8 जणांनी केला आहे.
मसूदा प्रकाशित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी 5 जणांना कमी करण्यात आले होते तर अन्य चार जणांना पुढच्या दोन महिन्यांत नोकरी गमवावी लागली. मस्क यांच्यावर जाहीर टीका करणाऱ्या बेन लीब नावाच्या एका अभियंत्यालाही अलिकडेच काढून टाकण्यात आले आहे. ज्या तांत्रिक बाबींबद्दल हा माणूस बोलत आहे त्याच्या बद्दल काहीच ज्ञान नाही अशी थेट टीका लीब यांनी केली होती.
Elon Musk : एलॉन मस्कने भारताच्या ट्विटर युजरची ‘या’ कारणाने मागितली माफी
दरम्यान, आपल्या कंपनीतील कोणालाही सीईओ करण्याची आपली इच्छा नसून आपण नव्या व्यक्तीच्या शोधात असल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे.