भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्व स्तरातील लोकांसाठी रेल्वे प्रवास खूप सोपा आणि अधिक सोयीचा आहे. विशेषतः लांबचा प्रवास असेल तर लोक ट्रेनने प्रवास करण्याला प्राधान्य देतात.
याचे एक कारण म्हणजे ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा. ट्रेनमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. पण काही वेळा काही लोकांकडे आरक्षण तिकीट नसल्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यासाठी खूप अडचणी येतात.
या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला तिकिटाशी संबंधित अशीच एक माहिती देणार आहोत, जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आता तुमच्याकडे रेल्वेचे आरक्षण तिकीट नसले तरी तुम्ही रेल्वेत तिकिटाशिवाय प्रवास करू शकता. चला तर मग जाणून घेऊया भारतीय रेल्वेच्या या खास आणि अतिशय महत्त्वाच्या नियमाबद्दल.
* असा प्रवास करू शकता
यापूर्वी तुम्हाला तिकिटाचे आरक्षण करून प्रवास करावा लागत होता, त्यानंतर तुमच्याकडे फक्त तत्काळ तिकिटाचा पर्याय होता. ज्याद्वारे तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट बुक करत असत. मात्र अनेकवेळा गर्दीमुळे लोकांना तात्काळ तिकीटही मिळू शकत नाही. मात्र आता निराश होण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्टेशनवर उपलब्ध असलेल्या प्लॅटफॉर्म तिकिटावरच प्रवास करू शकता !
* जर तुमच्याकडे आरक्षण तिकीट नसेल तर तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता. यानंतर तुम्हाला टीटीला भेटावे लागेल, जो त्या प्लॅटफॉर्म तिकिटाच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानापर्यंतचे तिकीट देईल. तुम्ही त्यासोबत प्रवास करू शकता.
* सीट उपलब्ध नसतील तर काय करावे?
काही वेळा ट्रेनमध्ये सीट रिकाम्या नसतात. तरीही तुम्ही प्रवास करू शकता. तुम्ही टीटी ला भेटल्यास आरक्षण सीट नसतानाही ते तुम्हाला प्रवास करू देतात. नियमानुसार, टीटी तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. परंतु तुम्हाला 250 रुपयांच्या दंडासह संपूर्ण भाडे भरावे लागेल.
* प्लॅटफॉर्म तिकीट म्हणजे काय?
प्लॅटफॉर्म तिकीट खास अशा लोकांसाठी आहे जे आपल्या नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडायला जातात. अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेने ठरवून दिलेले हे तिकीट घेणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल. मात्र रेल्वेच्या या नियमानंतर आता या प्लॅटफॉर्म तिकीटावरच तुम्हाला प्रवासदेखील करता येणार आहे. तुम्ही स्टेशनवरूनच प्लॅटफॉर्म तिकीट फक्त 10 रुपयांमध्ये मिळवू शकता.