टोकियो : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू हिने ऐतिहासिक कामगिरी करता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं.
चिनी ताइपेच्या खेळाडू विरुद्ध सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवामुळे सिंधूची सुवर्णपदकासह रौप्य पदक मिळवण्याची संधीही हुकली होती.
तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात सिंधूने दमदार पुनरागमन करत सामना दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. तिने जगातील सध्या 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या ही बिंगजियाओ (He Bingjiao) हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावलं.
याआधी सिंधूने रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक पदक मिळविणारी सिंधू भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.