आजचे भविष्य (रविवार, २५ एप्रिल २०२१)

मेष : सलोख्याचे संबंध राहतील याची काळजी महिलांनी घ्यावी. घरात शुभकार्ये ठरतील. प्रवास घडेल.

वृषभ : कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे हातावेगळी कराल. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील.

मिथुन : व्यवसायात कामात आवश्‍यक व योग्य व्यक्तिंकडून सहकार्य मिळाल्याने तुमचा कामाचा हुरूप वाढेल.

कर्क : नोकरीत परदेशगमनाची संधी चालून येईल. लाभ घ्या. वरिष्ठ न मागता कामात सवलती देतील.

सिंह : घरात तरूणांनी सतर्क रहावे. आप्तेष्ट व नातेवाईकांच्या भेटीगाठींचे योग येतील. दगदग धावपळ कमी करावी.

कन्या : भरपूर उत्साह देणारे ग्रहमान आहे. स्वतःचे कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. प्रवास घडेल.

तूळ : व्यवसायात तुमच्या मताला मान मिळेल. त्यामुळे प्रगतीचा वेग राखता येईल.

वृश्‍चिक : विचार व कृती यांची योग्य सांगड घालाल. कामे पूर्ण करता येतील. भांडवलाची तरतूद होईल.

धनु : नोकरीत कामातून आर्थिक लाभाचा फायदा. वरिष्ठ जादा अधिकार देतील त्याचा गैरफायदा घेऊ नका.

मकर : मित्रमैत्रीणी समवेत वेळ मजेत जाईल. स्पर्धकांच्या पुढे जाण्याचा विचार तुमचा असेल.

कुंभ : नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील.

मीन : सहकारी कामात मदत करतील. घरात वातावरण आनंदी व उत्साही राहील. तूर्तीस घरात बदल करू नयेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.