वाघोली – पूर्व हवेली तालुक्यातील गेल्या दोन वर्षापासून करोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भाव च्या काळात अतिशय उत्तम सेवा देणाऱ्या आरोग्य, पोलीस व पत्रकार बंधु यांना सन्मानित करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांचा विमा काढण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे युवा नेते प्रदीप वसंत कंद यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांमध्ये आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी व या आरोग्य व्यवस्थेला मोलाची मदत करणाऱ्या समाजातील घटकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांना सन्मानित करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पूर्व हवेली तालुक्यातील कर्मचारी वर्गाचा विमा काढण्यात येत असून याची सुरुवात शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधवांचा विमा काढून करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे युवा नेते प्रदीप वसंत कंद यांनी दिली आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.