मुंबई- झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे.
४ वर्ष आणि १२०० एपिसोडचा टप्पा पूर्ण करताना नंदिता परत येतेय, नवा ट्विस्ट घेऊन! कटकारस्थान, फसवेगिरी या सगळ्यात शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वाहिनी म्हणजेच आपल्या वाहिनीसाहेब यांची मालिकेत पुन्हा एन्ट्री होतेय, सोबत सुरज पण असणार आहे.
आता या दोघांना राणा दा आणि गोदाक्का घरात घेतील का ? नंदिताच्या अरेरावी स्वभावाला जिजा कसा उत्तर देईल, हे येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मालिकेत नंदिताची भूमिका धनश्री काडगावकर करणार नाही आहे.
दरम्यान, धनश्री धबडगावकर सध्याण तिचे मॅटर्निटी डेज एन्जाॅय करते आहे. मात्र प्रेग्नंसीच्या कारणामुळे ती मालिकेत परत येऊ शकणार नाही आहे. नंदिताच्या भूमिकेवर महाराष्ट्राने प्रेम केलं. मात्र ही नवी नंदिता महाराष्ट्राला आवडते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.