फिटनेस फ्रिक अभिनेता टायगर श्रॉफ हा बॉलीवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. दिशा पटानी सोबतच्या ब्रेकअपनंतर टायगर त्याच्या सिंगल स्टेटस एन्जॉय करत आहे. टायगरनेही स्वत:साठी नवीन जोडीदार शोधण्यास सुरुवात केली आहे. दिशासोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगरचे मन दुसऱ्या अभिनेत्रीकडे वळले आहे.
टायगर श्रॉफ करण जोहरच्या मसालेदार शो कॉफी विथ करणमध्ये दिसणार आहे. कॉफी विथ करणच्या सोफ्यावर टायगर श्रॉफ त्याच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे करताना दिसणार आहे. करण जोहरच्या शोमध्ये टायगरनेही शेवटी त्याचे रिलेशनशिप स्टेटस क्लिअर केले आहे.
टायगरने शोमध्ये सांगितले की, ‘तो सध्या सिंगल आहे. टायगरने या शोमध्ये खुलासा केला की त्याला बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आवडते आणि तिला तिच्याबद्दल आकर्षण वाटते. टायगर म्हणाला,’मी सिंगल आहे. मला असे वाटते. मी कोणालातरी शोधत आहे. टायगर इथेच थांबला नाही, तो पुढे म्हणाला ,’मी नेहमीच श्रद्धा कपूरकडे आकर्षित होतो.’
टायगर श्रॉफने करण जोहरच्या शोमध्ये इतके स्पष्ट केले आहे की तो आणि दिशा पटानी आता वेगळे झाले आहेत. टायगर आता त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.
टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने इंडस्ट्रीत एक विशेष ठसा उमटवला आहे. टायगर श्रॉफने 2014 साली ‘हिरोपंती’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो लवकरच गणपत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनही कॅमिओ करताना दिसणार आहेत. टायगरचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचे किती प्रेम मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.