फिटनेस फ्रिक अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, दिशा-टायगरने त्यांच्या 6 वर्षांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. म्हणजेच आता दिशा आणि टायगर हे जोडपे म्हणून एकत्र नाहीत. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या आहे.
टायगर-दिशाचे ब्रेकअप
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलिवूडमधील आवडते जोडपे आहेत. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. पण आता दिशा आणि टायगर जोडी म्हणून एकत्र दिसणार नाहीत. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार टायगर आणि दिशा यांच्या नात्यात गेल्या एक वर्षापासून बरेच चढ-उतार आले होते. पण या जोडप्याने ही गोष्ट कधीच कळू दिली नाही.
दिशा आणि टायगरने वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याचे खरे कारण समोर आलेले नाही. पण हे दोन्ही स्टार्स आता सिंगल लाईफ जगत आहेत हे नक्की. हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना टायगरच्या एका मित्राने दोघांच्या ब्रेकअपची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. टायगरच्या मित्राचे म्हणणे आहे की, ‘ब्रेकअपमुळे टायगरला त्याच्या कामात काही फरक पडू दिला नाही. तो पूर्वीप्रमाणेच आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. टायगर सध्या लंडनमध्ये त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.’
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दिशा पटानी ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी टायगर श्रॉफ ‘गणपत’ आणि ‘बागी-4’मध्ये आपली ताकद दाखवताना दिसणार आहे. दिशा आणि टायगर आता जोडप्यासारखे एकत्र नसले तरी त्यांची मैत्री अजूनही कायम आहे.