Hrithik Roshan – अभिनेता सलमान खानच्या (salman khan) ‘टायगर 3’ (tiger-3) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे कारण ‘टायगर 3’ दिवाळीला रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे आता या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनही (hrithik roshan) दिसणार आहे.
नुकतंच, टायगर 3 च्या निर्मात्यांनी जाहीर केले आहे की, या चित्रपटात सलमान खानसोबत हृतिक रोशन देखील दिसणार आहे. या घोषणेनंतर आता हृतिक रोशनच्या चाहत्यांनाही या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.
यशराजच्या चित्रपटांमध्ये सलमान खानचा ‘टायगर 3’ आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ यांचा समावेश आहे. आता हृतिक रोशनचा ‘कबीर’ चित्रपटही या यादीत सामील होणार आहे. हे सर्व चित्रपट यशराज फिल्म्सच्या ‘स्पाई यूनिवर्स’चा भाग आहेत.
मनीष शर्माचा ‘टायगर 3’ हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगूमध्येही रिलीज होणार आहे. टायगर 3 मध्ये शाहरुख खानचीही छोटी भूमिका आहे. म्हणजेच पुन्हा एकदा शाहरुख खान आणि सलमान खान मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
टायगर 3 दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 12 नोव्हेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. याच चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग उद्या पासून म्हणजेच, 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.