कर्नाटकात तीन पुजाऱ्यांची हत्या

बंगळुरू – कर्नाटकातील प्रसिध्द अर्केश्‍वरा स्वामी मंदिरातील तीन पुजाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात शुक्रवारी या पुजाऱ्यांचे मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

गणेश, प्रकाश आणि आनंद ही त्यांची नावे आहेत. गुट्टलू येथे हे मंदिर असून दगडाने ठेचून या तिघांची हत्या करण्यात आली असल्याचे प्राथमिक माहितीद्वारे समजते आहे. दरम्यान, ही अत्यंत अस्वस्थ करणारी घटना असून तातडीने कारवाई केली जाईल. दोषींना लवकरच तुरूंगात टाकले जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी पाच लाखांची मदतही जाहीर केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या आवारातच तीनही पुजाऱ्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्या डोक्‍यावर जखमा होत्या. मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांचे हे कृत्य असावे अशी शंका आहे. मंदिराच्या दानपेटीतील रक्कमही गायब असून तेथे काही नाणी तेवढी शिल्लक राहीली आहेत.

दरम्यान, चोरांनीच पुजाऱ्यांची हत्या केली असल्याचा कयास स्थानिक माध्यमांनीही वर्तवला आहे. मंदिराच्या दर्शनी भागातच मृतदेह आढळून आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.