स्चिफोय (नेदरलॅन्ड) – मलेशियाच्या प्रवासी विमान अपघात प्रकरणी नेदरलॅन्डमदील न्यायालयाने रशियाच्या एका आणि रशिया धार्जिण्या युक्रेनमधील एका विभाजनवादी व्यक्तीला त्यांच्या अनुपस्थितीत दोषी ठरवले आहे. या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पुराव्या अभावी रशियाच्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी युक्तीवाद चालला होता. दोषी ठरवण्यात आलेल्यांवर या विमानातील सर्व 298 प्रवाशांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता.
17 जुलै 2014 रोजी हे MH17 विमान कोसळून 298 जण ठार झाले होते. 777 बोईंग विमान ऍम्स्टरडॅम येथून मलेशियात कुआलालांपूर येथे जात असताना क्षेपणास्त्र लागल्यामुळे कोसळले होते. हे क्षेपणास्त्र रशिया धार्जिण्या युक्रेनच्या विभाजनवाद्यांनी डागले होते.