AUS vs ENG – ऍडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या ( AUS vs ENG ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 287/9 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 चेंडू बाकी असताना 291/4 धावा करत सामना जिंकला. मात्र, इंग्लंडच्या डेव्हिड मलानला सामन्यातील त्याच्या शानदार शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
हार्दिक पंड्याची रोहितवरच टीका, विश्वकरंडक स्पर्धेतील चुकांवर ठेवले बोट, म्हणाला…
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. कांगारूंनी गोलंदाजीत जबरदस्त सुरुवात केली. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर पहिल्या पाच षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. फिल सॉल्ट 14 धावा तर जेसन रॉय देखील अवघ्या 6 धावा करून बाद झाला. यानंतर जेम्स व्हिन्स, सॅम बिलिंग्ज आणि जोस बटलर यांना झटपट बाद करण्यात कांगारूंना यश आले.
मात्र डेव्हिड मलानने एका बाजूने धावा करत राहिला आणि त्याला डेव्हिड विलीचीही साथ मिळाली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. मलानने शतकीय खेळी करत 134 धावा केल्या. तर डेव्हिड विली 34 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पाने प्रत्येकी तीन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने पहिल्या गड्यासाठी 147 धावांची शतकीय भागीदारी केली. हेड 69 धावा करून बाद झाला. पुढे वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. वॉर्नर चांगली फलंदाजी करताना 84 चेंडूत 86 धावा करून बाद झाला. मार्नस लबुशेन आणि अॅलेक्स कॅरी लवकर बाद झाले. दरम्यान, स्टीव्ह स्मिथने नाबाद 80 धावा करत संघाला ( AUS vs ENG ) विजय मिळवून दिला. कॅमेरून ग्रीनही 20 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Australia win comprehensively to go 1-0 in the three-match ODI series 🔥
Watch the remainder of the #AUSvENG ODI series LIVE on https://t.co/MHHfZPzf4H (in select regions) 📺 pic.twitter.com/WWnx87TCDT
— ICC (@ICC) November 17, 2022