मुंबई – अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा चित्रपटाने साऊथसह संपूर्ण देशात दमदार कमाई केली. पुष्पाच्या आगळ्यावेगळ्या स्टाईल आणि डायलॉगबाजीमुळे चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. आता अनेकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची प्रतीक्षा आहे. ‘झुकेगा नही साला’ या डायलॉगमुळे अल्लू अर्जुनने थिएटरमध्ये अक्षरशः आग लावली. परंतु दुसऱ्या पार्टमधे हा डायलॉग बदलला जाणार असल्याचा खुलासा अल्लूने केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना अल्लू अर्जुनने आपल्या डायलॉगबाबत खुलासा केला.
पुष्पाच्या दुसऱ्या पार्टची चाहते वाट पाहत आहेत. अशात दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरु झाल्याच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यानंतर आता यातील डायलॉगबाबतचा खुलासा अल्लू अर्जुनने केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना अल्लू म्हणाला मला माहितीय तुम्ही मला इथे पुष्पाचा डायलॉग बोलायला लावणार आहात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिल्या पार्टमधे ‘झुकेग नही साला’ हा डायलॉग होता. आता दुसऱ्या पार्टमध्ये ‘बिल्कूल झुकेगा नही’ असा असणार. अल्लूने हा डायलॉग बोलताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. याचा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होतोय.
#PushpaTheRule Aslu Thaggedhele 🤩🔥@alluarjun @PushpaMovie #Pushpa pic.twitter.com/W0Wz30n2SY
— TelanganaAlluArjunFC™ (@TelanganaAAFc) November 6, 2022
पुष्पा २ ची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. परंतु त्या आधी अल्लूने दिलेली चित्रपटाबाबतची ही अपडेट चाहत्यांसाठी खूप मोठी आहे.या चित्रपटामध्ये आता आणखी काय काय नवीन पाहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.