-->

चोरट्यांनी फोडले दारुचे दुकान

डिकसळ (वार्ताहर): कोरोनाचा रोगाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच तळीरामांची मात्र मोठी गैरसोय होत असल्यामुळे तळीराम संचारबंदीचा फायदा उचलत काही तळीरामांनी चक्क दारूच्या दुकानावरच डल्ला मारायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये दारुड्यांनी भिगवण (ता.इंदापूर) येथील देशी दारुचे दुकान फोडून १ लाख ८२ हजार रुपयांची दारु लंपास केलीय.

याबाबत भिगवण पोलिस स्टेशनला वामन कृष्णा मासाळ यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे देवकर भिगवण (ता इदापूर) हद्दीत इंद्रायणी देशी दारू चे दुकानात असून यामधील दारू विक्रीचे दुकानाचे शटरचे कुलुप कशाने तरी तोडून त्याद्वारे दुकानास जोडून असलेल्या गोडाऊनमध्ये प्रवेश करून गोडाऊन मध्ये ठेवलेल्या देशी दारूच्या वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 86 दारूचे बॉक्स किंमत 1 , 82 , 000 रुपयांचे चोरून नेले आहेत. पुढील तपास सहा . फौजदार काळे हे करित आहेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.