नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज युरोपियन संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाना संबोधित केले. युरोपियन युनियनचे २८ सदस्यांचे शिष्टमंडळ आज भारत दौऱ्यावर होते. काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर तेथील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ आले होते.
डोवाल यांनी शिष्ठमंडळाला जम्मू-काश्मीरमधील भारतीय संघाच्या पुरोगामी कायद्यांच्या अंमलबजावणीत कलम ३७० मध्ये अलगाववादी प्रवृत्तींना चालना दिली गेली. आणि अडथळा निर्माण केला, अशी माहिती दिली. असे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
डोवाल यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीविषयीच्या तथ्यांवर प्रकाश टाकला आणि पाकिस्तानने केलेल्या चुकीच्या प्रचाराचा प्रतिकार केला. काश्मीरमधील हालचालीवर कोणतेही बंधन नाही. १००% लँडलाईन व मोबाइल टेलिफोन कार्यरत आहेत. अत्यावश्यक पुरवठा करण्याची कमतरता नाही. सर्व रुग्णालये कार्यरत आहेत, असे डोवाल यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांना लक्ष्य करुन सामान्य स्थितीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला असला तरी राज्य सरकार अर्थव्यवस्था, शैक्षणिक संस्थांचे कामकाज सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न करत असल्याचे डोवाल म्हणाले.