मुंबई – ‘सुपर 30’ आणि ‘बाटला हाऊस’ या चित्रपटांमधील दमदार अभिनयानंतर अभिनेत्री ‘मृणाल ठाकू’र आता आगामी ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. टेलिव्हिजनवरून थेट बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणारी मृणाल ठाकूर अभिनय असो वा बोल्ड फोटोशूट तिने अनेक आघाडीच्या नायिकांना मागे टाकले आहे. आणि आता मृणाल लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
दरम्यान, मृणाल ठाकूरला इथं पर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. तिला ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगचा देखील सामना करावा लागण्याचे स्वतः मृणाल हिने सांगितलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तिने बॉडी शेमिंग बद्दल खुलासा केला आहे.
मृणाल म्हणाली की मला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. लोकांनी अनेकदा मला माठ किंवा मटका म्हणूनही हिणवले आहे. माझ्या तब्येती वरून मला अनेकदा लोक ऐकवायचे. अनेकदा फुकटचे सल्ले ही दिले जायचे. मात्र मी या असगळ्याकडं दुर्लक्ष केले. आणि स्वतः कडे लक्ष केंद्रित केलं.
मृणाल म्हणते की बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीची फिगर झिरो असणे गरजेचं नाही. तब्येत सदृढ राहणे महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीरच्या अनेकगोष्टी या तुमचा बॉडी शेप कसा आहे यावर निर्भर करतात. असं मृणाल ठाकूर म्हणाली.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्वतःच्या नावाचा दमदार ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने 2012 मध्ये ‘मुझसे कुछ कहते हैं.. ये खामोशियां’ या मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. मात्र ‘कुमकुम भाग्य’ या टेलिव्हिजन शोमधून तिला खूप लोकप्रियता आणि स्वतःची वेगळी ओळख मिळाली.