नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल दिवसभरात देशात ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे लसीकरणावरून आताही लोकांच्या मनात शंका आहेत.
याचाच एक व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. बलिया जिल्ह्यातील एका स्थानिक नागरिकांनी लसीकरण टाळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याचे दिसून आले आहे. या घटनेचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोशलवर व्हायरल व्हिडियो हा बलिया जिल्ह्यातील हडियाकला गावातला आहे. सोशलवर या गावातील स्थानिकांनी आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या या व्हिडियोचा तीव्र निषेध केला जात आहे.
उत्तर प्रदेशबरोबरच बिहार, मध्य प्रदेशमध्येही असे प्रकार अनेकदा घडले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार मध्य प्रदेशमधील एक मुलगी लस नको म्हणून झाडावर चढून बसलेली. तिला झाडावरुन खाली उतरवताना आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती.