नवी दिल्ली – देशातील कोविड-19 मुक्तीची संख्या आज जवळपास 21 लाखांपर्यंत पोहोचली. गेल्या 24 तासात 58,794 जणांच्या रोगमुक्तीसोबतच, भारतातील कोविड-19च्या रुग्णांच्या रोगमुक्तीचा दर 74 टक्के पर्यंत पोचला. यावरून गेल्या काही महिन्यात रुग्णांचा बरे होण्याचा दर सतत वाढत आहे हे लक्षात येते.
भारतात करोनामुक्तांची संख्या 14 लाख झाली आहे, अजून बाधित असलेल्यांची संख्या 6 लाख 86 हजार 395 इतकी असून हे रुग्ण अजून वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. त्यांच्या संख्येहून करोना मुक्त झालेल्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. म्हणजेच आता बाधित असलेल्यांची एकूण संख्या कमी होऊन एकूण बाधित झालेल्यांच्या संख्येच्या 24.19 टक्के एवढीच आहे.