मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली.
दरम्यान, या संकट काळात अनेकांसाठी ‘देवदूत’ बनून आलेल्या सोनू सूदचं चक्क आता मंदिर उभारण्यात आले आहे. तेलंगणामधील सिद्दीपेट येथिल दुब्बा तांडा गावातल्या लोकांनी सोनू सूदचं मंदिर बांधलं आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल हे मंदिर बांधल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे.
Telangana: Locals of Dubba Tanda village in Siddipet have constructed a temple to recognize Actor Sonu Sood’s philanthropic work.
A local says, “He helped so many people during the pandemic. It’s a matter of great delight for us that we’ve constructed his temple.” (20.12.2020) pic.twitter.com/XZoj6x55pq
— ANI (@ANI) December 20, 2020
सोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली ‘कल्लाझागर’ या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आजवर कलाविश्वात सोनूच्या वाट्याला जास्तीकरून खलनायकी भूमिकाआल्या. मात्र, मोठ्या पडद्यावरील हा खलनायक खऱ्या आयुष्यात एका सुपरहिरोहून कमी नाही.