अंटार्टिका : हिम, बर्फ आणि पेंग्वीनसाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर अंटार्टिका खंडात 18.3 अंश सेल्सियस तापमानाचू नोंद झाली. हा तापमानाचा उच्चांक अआहे. अर्जेटिनाच्या संशोधन केंद्रावर हे तापमान नोंदवण्यात आले. मात्र, जागतिक हवामान संस्थेकडून त्याची खातरजमा होऊ शकली नाही.
आम्ही जे पाहिले तो एक उच्चांक होता, असे निवेदन या संस्थेत संशोधन करणाऱ्या रॅन्डेल केरीव्हेनी यांनी प्रसिध्दीस दिले आहे. याबाबत निश्चिती देण्यास आणखी काही तपशीलाची आम्ही वाट पहात आहोत, असे त्यांनी यात म्हटले आहे.
इस्पेरांजा या नावाने ओळखल्या जाणारे हे केंद्र दक्षिण अमेरिकेच्या टोकावर आहे. या भागातील तापमान वाढीबाबत हे केंद्र गेले अर्धशतक इशारा देत आहे. या काळात जवळपास तीन अंश सेल्सियस तापमानवाढ नोंदवली गेली आहे. केरीव्हेनी म्हणाले , अचानकपणे काही वेळा तापमान वाढ होत असते. पर्वताच्या उतारावरून येणाऱ्या वाऱ्याचा तो परिणाम असू शकतो.
यापुर्वीचा तापमानाचा उच्चांक 2015च्या मार्चमध्ये 17.5 अंश सेल्सियस नोंदवला गेला आहे. अंटार्टीका आणि आर्टीक या पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात पृथ्वीवर सर्वात जास्त तापमान वाढ नोंदवली जात असते. त्याबाबतचा इशारा वेळोवेळी देण्यात येत असतो.