जुन्नर तालुक्यातील ज्ञानमंदिरास अवकळा
बेल्हे- निसर्ग चक्रीवादळात जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा व आश्रमशाळांचे एकूण 44 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी नुकसान झालेल्या शाळांची पाहणी केली आहे.
यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकुंबे, चिंचेचीवाडी, निमगिरी, तळ्याचीवाडी, बारकी, वसईवाडी, बोरीचीवाडी, कवटेवाडी, बगाडवाडी, गोळेगाव, आळू, मुथाळणे, धावशी, सोमतवाडी, चिंचोली, डिंगोरे आदी जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा व काही आश्रमशाळामध्ये आपटाळे हायस्कूल, शितळेश्वर विद्यालय सितेवाडी, शासकीय आश्रमशाळा अंजनावळे, आश्रम शाळा तळेरान, सरस्वती विद्यालय उदापूर, आदी शाळांचे वादळात छतांचे पत्रे व किचनशेडचे पत्रे उडाले आहेत. शाळेतील काही शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाले आहे.