सोरतापवाडी – करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. पेठ (ता. हवेली) येथील शाळेत येताना मुलांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. शाळेमध्ये शिक्षक व पदाधिकार्यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वह्या, पुस्तके, गणवेश व शाळांमध्ये शालेय साहित्य, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आल्याची माहिती सरपंच सुरज चौधरी यांनी दिली.
यावेळी पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, यशवंत कारखान्याचे माजी संचालक रघुनाथ चौधरी, उपसरपंच वर्षाराणी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य जयश्री चौधरी, तानाजी चौधरी, शोभा चौधरी, शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय चौधरी, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, गणेश गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुळशीराम चौधरी, सतीश चौधरी, मुख्याध्यापक भुवड, शिक्षक संदीप गायकवाड व सर्व शिक्षक उपस्थित होते.