पिंपरी, दि. 19 – भावाला मारहाण केल्याचा बहिणीने जाब विचारला असता दोन जणांनी तिला लोखंडी रॉडने मारहाण केली. तिच्या आईला हाताने मारून लहान बहिणीच्या पोटात चाकू घुपसला. ही घटना शुक्रवारी (दि. 16) आणि शनिवारी (दि. 17) पाटील नगर, चिखली येथे घडली.
याप्रकरणी जखमी 23 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास शिंदे, योगेश देवकुळे (रा. रामदास नगर, चिखली) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी शुक्रवारी (दि. 16) गेल्या असता आरोपी महिलेने फिर्यादींच्या डोक्यात रॉडने मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींच्या आईला बोलण्यासाठी घराबाहेर बोलावून हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीची लहान बहीण भांडण सोडवत असताना तिलाही आरोपींनी मारहाण करून योगेश देवकुळे याने तिच्या पाठीत चाकूने मारून गंभीर दुखापत केली.