लखनौ: अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या भूमिपूजनाच्या पवित्र मुहूर्ताची वेळ केवळ 32 सेकंद आहे. ही वेळ 12 वाजून 44 मिनिट 8 सेकंद आहे आणि ती 40 सेकंदांनी संपेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वाजून 15 मिनिटांनी पूजा करतील.
भक्त हनुमानाशिवाय प्रभू रामचंद्र कोणतेही काम करत नसत. त्यामुळेच मोदी आणि योगी आदित्यनाथ हे हनुमान गढीत विशेष पूजा करणार आहेत. हनुमानजींचा आशीर्वाद घेऊन ते राममंदिराच्या भूमिपूजनाची वीट रचतील, असे हनुमान गढीचे मधुबन दास यांनी सांगितले.
राम जन्मभूमिवर रामाचार्यपुजेचे वैदिक विधी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू होतील. त्यासाठी 21 पंडितांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील आठ जण आयोध्येतील, वाराणसी आणि दिल्लीतील प्रत्येकी पाच, आणि तीन जण तामिळनाडूतील कामीकोची येथील आहेत.
भूमिपूजनाच्या उद्या होणाऱ्या सोहोळ्यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली आहे. या विधीसाठी आलेल्या भाविकांनी करोना साथीचे भयही झुगारून दिले आहे. त्या शिवाय देशातील अतीमहत्त्वाच्या व्यक्तीही या सोहोळ्यासाठी विशेष करून उपस्थित राहणार आहेत.