बेल्हे – मुंबईवरून तरूण दीड महिन्यांपूर्वी नळवणे (ता. जुन्नर) येथे आला होता. विलगीकरण केले असताना त्याचा छातीत दुखू लागल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
त्यामुळे त्यांच्या संपर्कातील 11 जणांची करोनाची तपासणी केली असता सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती तलाठी विजय साळवे यांनी दिली.
हा तरूण मुंबईवरून आल्यावर गावात त्याचे विलीगिकरण केले होते. (दि.8) सकाळी त्याच्या छातीत दुखायला लागल्याने त्याला आणे येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रात्री त्याला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आळेफाटा येथे हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला होता.
या तरुणास दमा असल्याची लक्षणे असल्याने करोना संशयित म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील व्यक्ती, नातेवाईक, अशा 11 जणांची मंगळवार (दि.9) लेण्याद्री येथे कोविड सेंटरमध्ये तपासणी केली.