मुंबई – अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट ‘बवाल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारख रिलीज झाली आहे. ‘छिछोरे’सारखा यशस्वी चित्रपट दिल्यानंतर साजिद नाडियादवाला आणि नितेश तिवारीची जोडी पुन्हा एकदा ‘बवाल’ घेऊन येत आहे.
View this post on Instagram
निर्मात्यांनी ‘बवाल’च्या रिलीज तारखेबाबत ट्विटरवर पोस्ट केले आहे, साजिद सरांसोबतचा माझा दुसरा सहयोग आणि वरुण धवन आणि जान्हवी कपूर अभिनीत एक अतिशय मनोरंजक बवाल, 6 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘बवाल’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या आणि चाहते त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते.
‘बवाल’ ही प्रेमकथा आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ ते पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा येथे या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर आणि स्टंटमॅन यांना जर्मनीतून नेमण्यात आले होते. चित्रपटाच्या क्रूमध्ये 700 हून अधिक लोक होते.