मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक म्हणजेच अभिनेता ‘प्रदीप काबरा’ हा आपल्या खऱ्या आयुष्यात एका हिरोपेक्षा कमी कमी नाही.
होय… सध्या प्रदीपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायला झाला असून, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही श्रावणबाळची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हीही प्रदीपला कलियुगातील श्रावणबाळ म्हणाल.
View this post on Instagram
अभिनेता प्रदीप रोज न चुकता आपल्या आईला पाठीवर बसवून तिला समुद्रकिनारी घेऊन जातो. इथे आईकडून थेरपी सेशन करून घेतो. घरी तिचे पाय चेपून देण्यापासून अगदी तिला अंघोळ घालण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंत सगळं काही तो करतो.
View this post on Instagram
10 वर्षांपूर्वी त्याच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आला. तेव्हापासून प्रदीप आईची सेवा करतोय. त्याला ही वाटते की आपल्या आईने पूर्वी सारखे आनंदी आयुष्य जगावे.
अभिनेता ‘ प्रदीप काबरा’ने आपल्या फिल्मी करायची सुरवात एका तामिळ चित्रपटातून केली होती. तामिळ सिनेसृष्टीत प्रदीपचं मोठं नाव आहे.
तसंच प्रदीपने बॉलिवूड मध्ये सूर्यवंशी, सिम्बा, डेल्ही बेली, वॉन्टेड, दिलवाले आणि बागी सारख्या अनेक चित्रपटांत खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत.